गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

कलवरी पाणबुडी आजपासून नौदलात दाखल - १५ डिसेंबर २०१७

कलवरी पाणबुडी आजपासून नौदलात दाखल - १५ डिसेंबर २०१७

* नौदलाच्या सेवेत दाखल झालेल्या [आयएनएस] कलवरी या पाणबुडीचे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माझगाव गोदीत लोकार्पण करण्यात आले.

* [आयएनएस कलवरी] च्या रूपाने नौदलाच्या ताफ्यात १५ वर्षानंतर पाणबुडी दाखल झाली आहे. या पाणबुडीमुळे नौदल सक्षम झाले असून, ती मेक इन इंडिया चे उत्कृष्ट उदाहरण आहे.

* नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या [प्रोजेक्ट ७५] अंतर्गत ही पाणबुडी माझगाव बंदरात बांधण्यात आली. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी [डीसीएनएस] ने या पाणबुडीचे आरेखन केले.

* स्कॉर्पीन वर्गातील सहा पाणबुड्यापैकी ही पहिली पाणबुडी आहे. ही पाणबुडी भारत आणि फ्रांसदरम्यान वेगाने वाढणाऱ्या धोरणात्मक भागीदारीचे उत्तम उदाहरण आहे.

* कलवरी मुळे नौदलात आणखी भर पडली आहे. हिंदी महासागरात जागतिक धोरणात्मक आणि आर्थिकहिताबाबत भारत पूर्णतः सजग आहे.

* त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदल या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.