शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

राष्ट्रीय वैदयकीय आयोग विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी - १६ डिसेंबर २०१७

राष्ट्रीय वैदयकीय आयोग विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी - १६ डिसेंबर २०१७

* वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट्राचार आणि गैरप्रकार सोखण्यासाठी नवा नियामक आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

* सध्याची राष्ट्रीय वैद्यकीय परिषद [एमसीआय] मोडीत काढली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय वैदयकीय आयोग विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे.

* या विधेयकानुसार वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तसेच वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन आणि अधिस्वीकृती, नोंदणी यासाठी चार स्वायत्त मंडळे स्थापन केली जाणार आहे.

* रणजित रॉय चौधरी समितीच्या शिफारशी तसेच संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार हा आयोग स्थापन केला जात आहे.

* या आयोगाचा अध्यक्ष आणि काही सदस्य हे सरकारनियुक्त असतील. पाच सदस्य हे निवडणुकीतून निवडले जातील. तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.

* स्वायत्त मंडळाचे सदस्य हे कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील शोधसमितीकडून निवडले जातील. असे वरिष्ठ अधिकारी निवडले जाणार आहेत.

* या आयोगामार्फत सामूहिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. तसेच सर्व वैद्यकीय पदवीधरांनी अनुज्ञा परीक्षा घेतली जाईल.

* ही अनुज्ञा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वैद्यकीय व्यवसायसाठीचा परवाना दिला जाईल. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर तीन वर्षात अनुज्ञा परीक्षा सुरु केली जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.