बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

सहा मुस्लिम देशासाठी अमेरिकेची बंदी - ७ डिसेंबर २०१७

सहा मुस्लिम देशासाठी अमेरिकेची बंदी - ७ डिसेंबर २०१७

* सहा मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

* ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जानेवारीत लागलीच सुरक्षेचे कारण पुढे करत हा निर्णय घेतला होता.

* आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी झालेल्या सुनावणीत एकूण ९ नायायाधीशांपैकी ७ जणांनी या निर्णयाच्या बाजूने कौल देत याविषयी कनिष्ठ न्यायालयांनी घातलेले प्रतिबंध हटविले.

* या सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय इराण, लिबिया, सीरिया, येमेन, सोमालिया आणि चाड या सहा देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

* विशेष म्हणजे हे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही ठोस कारणाचा संदर्भ दिलेला नाही. या निर्णयाविरोधात कनिष्ठ न्यायालयात अदयाप सुनावणी प्रलंबित असली तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या प्रवासबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.