मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

मानसशास्त्रीय संशोधन विशेष लेख [पैशाने सुख विकत घेता येत नाही] - २७ डिसेंबर २०१७

मानसशास्त्रीय संशोधन  विशेष लेख [पैशाने सुख विकत घेता येत नाही] - २७ डिसेंबर २०१७

* जास्त उत्पन्न मिळवणारे लोक नंतर स्वार्थीपणाकडे झुकतात तर जे लोक तुलनेने कमी पैसे कमावतात ते त्यांचे नातेसंबंध चांगल्या प्रकारे जपतात तसेच त्यांची इतर लोकांशी मित्रता वाढण्याची वृत्ती असते असे अभ्यासातून दिसून आले.

* खूप पैसा मिळविला की सर्व समस्या सुटतात असा अनेकांचा समज असतो पण तो खरा नाही. उलट जास्त पैसे मिळविणाऱ्या व्यक्ती त्यांच्या जीवनात आपल्यापुरते पाहतात.

* थोडक्यात पैशाने सुख विकत घेता येत नाही असे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पॉल पीफ यांनी मानसशास्त्रीय संशोधनात म्हटले आहे.

* जर्नल इमोशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. असून त्यात १५१९ लोकांची पाहणी करण्यात आली. यात लोकांना त्यांचे उत्पन्न विचारण्यात आले होते व एक प्रश्नावली देण्यात आली होती.

* त्यात सुख, आश्चर्य, सहवेदना, समाधान, उत्साह, प्रेम व अभिमान तसेच गमतीदारपणा अशा अनेकानी त्यात म्हटले आहे. जे लोक जास्त उत्पन्न गटातील होते त्यांनी अभिमानाची भावना असल्याचे सांगितले.

* गरीब लोकांनी सहवेदना व प्रेम या भावनांवर भर देताना जगात भरपूर सौन्दर्य असल्याचे सांगून आजूबाजूच्या जगाबाबत आश्चर्य व नवतेची भावना व्यक्त केली आहे. याचा अर्थ पैसा ही बाब सुखाचे मोजमाप ठरवत नाही असा काढण्यात आला आहे.

* श्रीमंत लोकांना त्यांनी मिळवलेली धनदौलत, पदे, व्यक्तिगत, कामगिरी यात जास्त समाधान असते. तर गरिबांना इतरांच्या सुखात आपले सुख सापडते.

* श्रीमंत लोक आर्थिक स्वयंपूर्णता मिळवून कुणावर अवलंबित्व राहणार नाही असा विचार करतात. गरीब लोक मात्र सहजीवनाचा विचार करतात. असेही या मानसशास्त्रीय संशोधनातून दिसून आले. यातून गरीब व श्रीमंत यांच्या मानसशास्त्रीय वर्तनाचा उलगडा होतो.












0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.