शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

कुपोषणमुक्तीसाठी राष्ट्रीय पोषण मिशन मोहीम - २ डिसेंबर २०१७

कुपोषणमुक्तीसाठी राष्ट्रीय पोषण मिशन मोहीम - २ डिसेंबर २०१७

* देशातील बालकांना कुपोषणपासून मुक्ती देण्यासाठी [राष्ट्रीय पोषण मिशन] ही महत्वाकांक्षी मोहीम राबविली जाणार आहे. नीती आयोग, महिला व बालकल्याण, आरोग्य, त्याचप्रमाणे स्वछता व पेयजल मंत्रालय या सर्व विभागांना मिळून मंत्रिमंडळाने या मोहिमेला मंजुरी देण्यात आली.

* राष्ट्रीय पोषण मिशन मोहिमेसाठी आगामी तीन वर्षात ९०४६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

* [राष्ट्रीय पोषण मिशनची वैशिट्ये]

* आवश्यक उद्दिष्ट पूर्तीसाठी राज्यांना प्रोत्साहन देणार.
* तात्काळ माहिती पुरवण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकाना स्मार्टफोन आणि टॅब मिळणार.
* आशा आणि अंगणवाडी सेविकांनी नोंदणीसाठी जड रजिस्टर बाळगण्याचा प्रकार संपणार.
* योजनेचे सामाजिक लेखापरीक्षण होणार.
* विविध मंत्रालयाच्या योजनांचा ताळमेळ साधणार.
* सुरवातीला ३१५ जिल्ह्यात यावर्षी या मोहिमेचे आयोजन.
* निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या खात्यांच्या योजनांची सांगड घालणे.
* तात्काळ माहिती मिळविणे आणि जनजागृतीसाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे.
* तसेच अर्भक आणि बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देणे.

* २०१९-२० पासून देशातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पोषण मोहीम पोचणार आहे. ग्रामीण भागात, विशेषतः गरीब बालकांना कुपोषणाचा सामना करावा लागतो.

* कुपोषणामुळे त्यांच्या बुध्यांकावर परिणाम होतो. त्यामुळे पोषण मोहीम महत्वाची ठरणार असल्याचे मेनका गांधी यांनी सांगितले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.