सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

असोचेमचा [ईअर अहेड आऊटलूक अहवाल] - २६ डिसेंबर २०१७

असोचेमचा [ईअर अहेड आऊटलूक अहवाल] - २६ डिसेंबर २०१७

* २०१८ मध्ये भारताचा वृद्धिदर वाढून ७% होईल असे असोचेमच्या एका अहवालात नमुद करण्यात आले. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून त्याआधी अर्थव्यवस्था गतिमान झालेली असेल. असे अहवालात म्हटले आहे.

* असोचेमने जारी केलेल्या अहवालात [ईअर अहेड आउटलूक] या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. २०१७-१८ या वित्त वर्षात दुसऱ्या तिमाहीत वृद्धिदर ६.३% एवढा होता.

* आर्थिक विस्ताराबरोबर वृद्धिदरही वाढेल आणि सप्टेंबर २०१८ मध्ये तो ७% होईल. याच काळात महागाईचा दर ४ ते ५.५% राहील. पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतील वृद्धीसाठी मान्सूनची भूमिका महत्वाची राहील असे अहवालात म्हटले आहे.

* वृद्धीदराचा ७% अंदाज व्यक्त करताना सरकारच्या धोरणातील स्थैर्य, चांगला मान्सून, औद्योगिक हालचालींचा वाढता वेग, कर्ज वृद्धी आणि विदेशी चलन विनिमय दरातील स्थैर्य या बाबी गृहीत धरण्यात आल्या आहेत.

* २०१८ चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या बाजूने झुकलेला असेल, तसेच औद्योगिक क्षेत्रात रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्यात येईल. असे अहवालात म्हटले आहे.

* अर्थव्यवस्था वाढीचा लाभ रोजगारात परावर्तित व्हायला हवा, सध्या मात्र वास्तवात तसे काही दिसत नाही. २०१८ मध्ये धोरणे या दिशेने जाणारी असतील.

* सुधारणांअभावी ग्रामीण अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. तिला गती देण्यासाठी कृषी क्षेत्राकडे जास्त लक्ष दिले जाईल. असा अंदाज बांधता येतो.

* राजकीय आश्वासननंतर कित्येक राज्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहेत. सध्याच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विकण्याचे बंधन आहे.

* शेतमालाच्या आयात निर्यात धोरणातही सुधारणा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी हे आवश्यक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.