शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

नासाने शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला - १६ डिसेंबर २०१७

नासाने शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला - १६ डिसेंबर २०१७

* नासाच्या मोठया केप्लर डिस्कव्हरी या यंत्रणेने स्टार केप्लर ९० या नावाने आठ ग्रहांचा समावेश असलेल्या नवीन सौर मंडळाचा शोध लावला आहे.

* नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या कुत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने हा शोध लावला आहे. [केप्लर-९० आय] हे ग्रह प्रथमच आपल्या सौर मंडळाच्या रूपात मोठ्या संख्येने ग्रहमाला होस्ट करू शकतील.

* मानवी बुद्धी आणि यंत्रे यांच्या एकत्रित वापराने आपल्या सौर मंडळात नेमके काय आहे. याविषयी शोध सुरु आहे. केप्लर ९० आय हा एक लहान खडकाळ पृथ्वीसारखा ग्रह आहे.

* परंतु तो सूर्याच्या अगदी जवळ आहे. ग्रहमालेतील सूर्यापेक्षा जास्त गरम आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा अडीच हजार प्रकाश वर्षे जुना आहे.

* अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन संस्थेला मोठे यश मिळाले असून. केप्लर स्पेस टेलिस्कोप द्वारे आठ ग्रह असलेल्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे.

* केप्लर ९० आय त्यांच्या सूर्यमालिकेतील पृथ्वीप्रमाणेच तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्या कक्षेतील दर ९० बी आणि ९० सी हे दोन लहान ग्रह अनुक्रमे सात व नऊ दिवसांनी केप्लर - ९० च्या भोवती फिरतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.