रविवार, २४ डिसेंबर, २०१७

पाण्यावरही उतरणारे सर्वात मोठ्या विमानाचे चीनमध्ये उड्डाण - २५ डिसेंबर २०१७

पाण्यावरही उतरणारे सर्वात मोठ्या विमानाचे चीनमध्ये उड्डाण - २५ डिसेंबर २०१७

* तांत्रिक प्रगतीमध्ये नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या चीनने आता जगातील सर्वात मोठे जमीन आणि पाण्यावर उतरू शकणारे विमान तयार केले आहे.

* चार टर्बोप्रॉप इंजिनाचा समावेश असणारे [एजी ६००] विमान ५० माणसांना वाहून नेऊ शकतो. नैसर्गिक आपत्तीप्रसंगी शोध आणि बचाव मोहिमांमध्ये या विमानाचा वापर करता येईल.

* विमानतळाप्रमाणे हे विमान समुद्र आणि जमिनीवरूनदेखील अवकाशात झेपावू शकते. चीनने लष्कराच्या आधुनिकीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली असून, उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रपासून लढाऊ विमानापर्यंत सर्व शस्त्रसंपदा अद्ययावत केली जात आहे.

* या विमानाची एकूण क्षमता ५३.३ टन प्रवाशांसह विमानाचे कमाल वजन असून तर ४५०० किमीचा पल्ला एकावेळेस गाठू शकते.

* सागरी भागावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी चीन या विमानाला सागरी भागात तैनात करणार असून, चिनी कंपन्या आणि विविध सरकारी विभागाकडून १७ विमानाची ऑर्डर मिळाली आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.