बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१७

* शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या उत्कृष्टरीत्या वापर केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले केनियाचे वैज्ञानिक डॉ कॅलेस्टस जुमा यांचे १५ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.

* सोयाबीन आणि तुरडाळीच्यासारख्या आधुनिक शर्यतीत पारंपरिक बाजरी पौष्टिक असतानाही दुर्लक्षित असून, तिचे आंतराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी पुढील महिन्यात बंगळुरात आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.

* वाढता एनपीए आणि कमी होणारी भांडवल तरलता यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेने आणले आहेत.

* भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंह [WBO] ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

* भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI च्या महाव्यवस्थापकपदी साबा करीम यांची नियुक्ती करण्यात आली.

* ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट इंडिया स्टडी २०१७ च्या अहवालानुसार पतंजली हा भारताचा सर्वात विश्वसनीय फास्ट मुविंग कंज्यूमर गुड्स [FMCG] ब्रँड घोषित करण्यात आला.

* भारताच्या बंगळुरू शहरात सातवा आंतरराष्ट्रीय कॉफी फेस्टिवल [१६ ते १९] जानेवारीत आयोजित करण्यात येणार आहे.

* BSNL ने भारतीय ग्राहकांसाठी जियो आणि एअरटेलनंतर ४९९ रुपयात फिचर फोन उपलब्द करून दिला आहे.

* भारत मोबाईल डेटा वापरात जगात अव्वल ठरला आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशामध्ये दर महिन्याला वापरल्या जाणाऱ्या मोबाईल डेटाला एकत्रित केल तरीही एकट्या भारतातील मोबाईल डेटाचा वापर जास्त होतो.

* ट्युनिशियाच्या वाहतूक मंत्रालयाने एमिरेट्स एअरलाईन्स कंपनीच्या सर्व विमानांना देशात उतरण्यास आणि उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. कारण दुबईतून निघालेल्या विमानात दोन ट्युनिशीच्या महिलांना मज्जाव केल्याच्या निर्णयामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

* परदेशातून निधी मिळत असलेल्या स्वयंसेवी संस्था, व्यवसायिक आस्थापने, व्यक्ती यांना मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.

* लॉस एंजल्स आणि न्यूयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये [जस्ट वन मोअर डे] या चित्रपटाने स्थान मिळविले आहेत.

* जानेवारी २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये दोन दिवसीय [ASEAN] भारतीय प्रवासी दिवस आयोजित करण्यात येणार आहे.

* कर्नाटकातील बेंगळुरू हे असे भारतातले पहिले शहर ठरले आहे ज्याच्याकडे आपली स्वतःची ब्रँड ओळख आणि बोधचिन्ह [Logo] आहे.

* २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह ७ आरोपीवरील कठोर अशा मोक्का कायदांतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केले.

* सीरियाच्या १६ वर्षीय महंमद अल चाँद याला किड्स राईट्स फाउंडेशन चा आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.