गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

नॅशनल डिझाईन पुरस्कार सतीश रेड्डी यांना जाहीर - २२ डिसेंबर २०१७

नॅशनल डिझाईन पुरस्कार सतीश रेड्डी यांना जाहीर - २२ डिसेंबर २०१७

* संरक्षण क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक डॉ जी सतीश रेड्डी यांना क्षेपणास्त्र रचना व विकासकामासाठी नॅशनल डिझाईन पुरस्कार जाहीर झाला आहे.

* क्षेपणास्त्राच्या दिशादर्शक यंत्रणांच्या संशोधनात त्यांचे नाव आघाडीवर आहे. दिशादर्शक यंत्रणांच्या संशोधनात त्यांचे नाव आघाडीवर आहे.

* दिशादर्शित शस्त्रास्त्र प्रणाली स्वदेशी पातळीवर विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सध्या ते संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व क्षेपणास्त्र सामरिक प्रणाली कार्यक्रमाचे महासंचालक आहेत.

* त्यांच्या कार्यावर त्यांचे गुरु आणि दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम  यांचा ठसा आहे. कलाम यांच्यानंतर ज्युनिअर मिसाईल मॅन असा रेड्डी यांचा लौकिक आहे.

* त्यांना यापूर्वी होमी भाभा पुरस्कार, डीआरडीओ अग्नी पुरस्कार, तरुण वैज्ञानिक पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहे.

* रेड्डी यांनी डॉ कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे प्रमुख म्हणून निर्णायक भूमिका पार पाडली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला स्वयंपूर्तता प्राप्त करून देण्यात त्यांनी मोठे काम केले.

* लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हिगेशन या संस्थेचे ते पहिले भारतीय फेलो आहेत. रॉयल एरॉनॉटिकल सोसायटीचे ते सदस्य आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.