गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

अभिमत विद्यापीठांच्या कारभाराच्या अभ्यासासाठी समिती स्थापन - ८ डिसेंबर २०१७

अभिमत विद्यापीठांच्या कारभाराच्या अभ्यासासाठी समिती स्थापन - ८ डिसेंबर २०१७

* मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील अभिमत विद्यापिठाच्या कारभाराचा अभ्यास करण्यासाठी ३ सदस्यीय समिती नेमली आहे.

* ही समिती येत्या चार महिन्यामध्ये या विद्यापीठासाठी नियामक यंत्रणा देखील सुचवणार आहे. या निर्णयामुळे अभिमत विद्यापीठाच्या बेलगाम कारभाराला चाप बसणार आहे.

* आवश्यक मंजुरीशिवाय तांत्रिक शिक्षणासाठी दूरस्थ शिक्षण पद्धती राबविणाऱ्या चार अभिमत विद्यापीठांनी दिलेल्या इंजिनिअरिंग पदवी रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

* या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाने अभिमत विद्यापीठाच्या कारभाराला चाप लावण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.

* पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एल. नरसिंहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

* मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुखबीर सिंग संधू आणि ओळ इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे [एआयसीटीई] अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे या समितीचे सदस्य आहेत.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.