शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

'वॅसेनार अरेंजमेंट' मध्ये भारताचा समावेश - ९ डिसेंबर २०१७

'वॅसेनार अरेंजमेंट' मध्ये भारताचा समावेश - ९ डिसेंबर २०१७

* शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान ठेवणाऱ्या देशांच्या गटात भारताला स्थान देण्यात आले आहे. 'वॅसेनार अरेंजमेंट' असे या गटाचे नाव असून यामुळे भारताला महत्वाचे संरक्षण तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

* व्हिएन्ना येथे झालेल्या गटाच्या २ दिवसीय नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'वॅसेनार अरेंजमेंट' ने म्हटले आहे की गटात इच्छुक असलेल्या देशाच्या अर्जावर नियोजन बैठकीत चर्चा झाली आहे. 

* भारताला सदस्यत्व देण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या गटात स्थान मिळविणारा भारत हा ४२ वा देश ठरेल. गटाची पुढील नियोजन बैठक ऑस्ट्रलियातील व्हिएन्ना येथील डिसेंबर २०१८ मध्ये होईल. 

* अणवस्त्र प्रसारबंदी करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. यामुळे महत्वाची शाश्त्रास्त्रें तसेच संरक्षण तंत्रज्ञान भारताला मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. 

* आता 'वॅसेनार अरेंजमेंट' चा भारत सदस्य झाल्याने भारताला शाश्त्रास्त्रें आणि तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

* भारताला या गटात स्थान मिळाल्याने अणू पुरवठादार देशांच्या गटात स्थान मिळवण्यासाठी भारताची बाजू भक्कम झाली आहे. 

* अणू पुरवठादार देशांच्या गटात भारताला स्थान देण्यास विरोध करणारा चीन मात्र 'वॅसेनार अरेंजमेंट' गटाचा सदस्य नाही. 

* [ 'वॅसेनार अरेंजमेंट'] म्हणजे काय 

* 'वॅसेनार अरेंजमेंट' हा शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान  निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या देशांचा गट आहे. शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान निर्यातीत पारदर्शकता आणि जबाबदारीने ती व्हाव्ही यासाठी हा गट कार्यरत आहे. 

* या गटाच्या सदस्य देशांना दुसऱ्या देशांना संरक्षणविषयक निर्यात करताना लष्करी सामर्थ्य वाढीसाठी त्याचा वापर होणार नाही. 

* याची काळजी घ्यावी लागते. तसेच दहशतवाद्यांच्या हाती शस्त्रास्त्रे आणि संरक्षण तंत्रज्ञान लागू नये, हा या गटाचा मुख्य उद्देश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.