गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर - २९ डिसेंबर २०१७

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर - २९ डिसेंबर २०१७

* तोंडी तलाकसारख्या कुप्रथेला गुन्हेगारी कृत्य ठरविणारे मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक आज मंजूर करण्यात आले.

* या विधेयकावरील सर्वांच्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. मात्र त्यातील ३ वर्षाचा तुरुंगवास हा शिक्षेचा कालावधी कमी करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

* पीडित महिला स्वतःसह तिच्या अपत्यासाठी पोषण भत्ता मिळवण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्याने अर्ज करू शकते.

* संबंधित महिला आपल्या अपत्याचा ताबाही मिळवू शकते. न्यायदंडाधिकारीच याप्रकरणी निकाल देऊ शकतात. तोंडी अथवा ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअँप वरील संदेशाद्वारे दिलेला तलाक बेकायदा ठरून रद्द होईल.

* तोंडी तलाक देऊन पतीने पत्नीला घराबाहेर जाण्यास सांगितल्यास तिला या कायद्याद्वारे संरक्षण मिळेल. या कायद्यान्वये दोषीला ३ वर्षाची शिक्षा आणि दंड होईल.

* हा अजामीनपत्र दखलपत्र गुन्हा असेल हा कायदा जम्मू काश्मीर वगळता सर्व देशात लागू असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.