रविवार, ३ डिसेंबर, २०१७

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा येथे ५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प - ४ डिसेंबर २०१७

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा येथे ५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प - ४ डिसेंबर २०१७

* महाराष्ट्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०१५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निकाली काढण्यात आला आहे.

* अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला मान्यता मिळणार असून तो महानिर्मिती पूर्ण करणार आहे.

* पूर्ण प्रकल्पासाठी एकूण १,०२४ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ८२५ हेक्टर जमीन महानिर्मितीने विकत घेतली आहे.

* महानिर्मितीला राज्यात २,५०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प निर्मितीचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यापैकी ५०० मेगावॅटचे काम लवकरच सुरु होणार आहे.

* दोंडाईचा हा सौरऊर्जा प्रकल्प ५०० मेगावॅट चा असून सोन टप्प्यात तो पूर्ण केला जाईल. २५० मेगावॅट चा संच मार्च २०१९ तर दुसरा संच २०२१-२२ मध्ये पूर्ण केल्या जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.