बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

धीरेंद्रपाल सिंह यांची युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती - २८ डिसेंबर २०१७

धीरेंद्रपाल सिंह यांची युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती - २८ डिसेंबर २०१७

* एप्रिल २०१७ पासून रिक्त असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या अध्यक्षपदी धिरेंद्रपाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

* देशभरातील विद्यापीठांचे नियमन करणाऱ्या या संस्थेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे एप्रिल २०१७ पासून रिक्त होती.

* उत्तर प्रदेशातील शेतकरी कुटुंबात १९५६ साली जन्मलेल्या धीरेंद्रपाल यांनी गढवाल विद्यापीठातून पीएचडी मिळविली आहे. त्यानंतर अनेक विद्यापीठात अध्ययनाचे कार्य केले आहे.

* सध्या ते राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषद म्हणजेच नॅक च्या संचालक पदावर कार्यरत होते. देशातील अनेक संस्थांच्या विद्यापरिषदांवर किंवा कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले.

* त्यात बनारस विद्यापीठ, इंदूर विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, मिझोराम विद्यापीठ यांच्या कुलगुरुपदी त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.