बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

राज्यात उडान योजनेत शहरांचा विमानसेवेला मुहूर्त - १४ डिसेंबर २०१७

राज्यात उडान योजनेत शहरांचा विमानसेवेला मुहूर्त - १४ डिसेंबर २०१७

* उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा आता सुरु होणार आहे.

* केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत डेक्कन एअरवेज कंपनी मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे, व मुंबई-जळगाव, अशी २३ डिसेम्बरपासून विमानसेवा सुरु करणार आहे.

* एअर डेक्कन या कंपनीला दक्षिण आफ्रिकेतून १९ सिटरचे विमान खरेदी करण्याची परवानगी मिळाली. हे विमान राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर आज एअर डेक्कन कंपनीने हवाईसेवेसाठी तारीख व वेळापत्रक जाहीर केले.

* कंपनीच्या वेबसाईटवर उद्यापासून बुकिंगही सुरु केली जाणार आहे. १४२० रुपये प्रतिसिट असा नाशिक-मुंबई सेवेचा तिकीटदर आहे.

* येत्या २३ डिसेम्बरपासून जळगाव-मुंबई हवाई वाहतूक सुरु केली जाणार आहे. उडान योजनेमुळे सर्व शहराच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा विकास होणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.