बुधवार, २० डिसेंबर, २०१७

टूजी घोटाळ्यात ए राजा, कनिमोळी यांची दोषमुक्तता - २१ डिसेंबर २०१७

टूजी घोटाळ्यात ए राजा, कनिमोळी यांची दोषमुक्तता - २१ डिसेंबर २०१७

* टू जी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमके, नेत्या आणि खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपीना न्यायालयाने दोषमुक्त केले.

* काँग्रेसप्रणित युपीए२ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्टरम  घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. असा निष्कर्ष कॅग च्या अहवालात काढण्यात आला.

स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या ७ जानेवारी २००८ च्या प्रसिद्धी अधिसूचनेत ए राजा यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता. 

* २०११ मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते.

* गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित केले होते.

* गुरुवारी सकाळी न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला आहे. या आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने सर्व १७ आरोपीना दोषींमुक्त ठरविण्यात आले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.