बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

आधार जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ - १४ डिसेंबर २०१७

आधार जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ - १४ डिसेंबर २०१७

* बँक खाती आधार क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांची वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी तारीख ३१ मार्च ही नवी मुदतवाढ सरकारने केली आहे.

* नव्या निर्णयानुसार ही मुदतवाढ दोन प्रकारची असेल. नव्याने उघडलेल्या बँक खात्याना जोडणीसाठी खाते उघडल्यापासुन सहा महिन्यांची मुदत असेल.

* इतर खात्यासाठी ती ३१ मार्च २०१८ असेल. जोडणी न केल्यास खाते बंद होण्याचा परिणामही याच दोन पद्धतीच्या मुदतीनंतर लागू होईल.

* सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत ३३ कोटींपैकी १४ कोटी पॅन कार्ड आधारशी जोडली गेली आहेत. देशात आधार धारकांची संख्या ११५ कोटी आहे.

* विमा पॉलिसी, म्युच्युफंड, फंडाचे खाते, पीपीएफ खाते, पीपीएफ खाते व सरकारी योजनांच्या लाभासाठी उघडलेले खाते मात्र ३१ डिसेंबरपूर्वीच जोडून घ्यावे लागेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.