शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी - २४ डिसेंबर २०१७

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी - २४ डिसेंबर २०१७

* लालूप्रसाद यादव बिहारच्या मुख्यमंत्रीपदी असताना १९९०-९७ या कालावधीत सुमारे १००० कोटी रुपयांचा चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरवण्यात आला.

* यामध्ये लालूप्रसादासह माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्याबरोबर पशुसंवर्धन खात्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी, सनदी अधिकारी, पुरवठादार यांच्यासह अनेकजण अडकले.

* १९८५ साली तत्कालीन महालेखापाल टी एन चतुर्वेदी यांना बिहारच्या तिजोरीतून गेलेला पैसा गैरमार्गाने वळविण्याचा संशय आला.

* त्यानंतर दहा वर्षांनी खोटा खर्च ९०० कोटीपर्यंत गेल्याचे उघडकीस आले. १९९६ मध्ये बिहारचे तत्कालीन अर्थ सचिव व्ही एस दुबे यांनी सर्व जिल्हा न्यायदानाधिकाऱ्यानी या प्रकारात रकमा काढल्या.

* १९९६ पशुखाद्य गैरव्यवहार उघड, २००० लालूप्रसाद आणि राबडीदेवी पती पत्नीची सीबीआय चौकशी व लालूंची शरणागती.

* २००७ मध्ये पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक संचालक जुनुल भेंगराज, आणि राजा राम, तसेच चार पुरवठादार व लालूसह ५८ जण दोषी, ५ ते ६ वर्षाचा तुरुंगवास.

* १७ डिसेंबर २०१७ रोजी रांची येथील सीबीआय न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.