मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ६ डिसेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ६ डिसेंबर २०१७

* सुनील कुमार चौरसिया [Ordnance Factories] चे महानिदेशक आणि आयुध कारखाना मंडळ [OFB] चे अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

* आंध्र प्रदेश विधानसभेने राज्य शासनाच्या अखत्यारिस येणाऱ्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये [कापू] जातीला ५% आरक्षण प्रदान करणारे विधेयक पारित केले.

* विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहावे द्विशतक झळकावून त्याने सर्वाधिक द्विशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

* लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी [IAS] अधिकारी स्नेहलता श्रीवास्तव यांची लोकसभा महासचिव पदावर नेमणूक केली आहे. त्या लोकसभा सचिवालयाच्या प्रथम महिला महासचिव ठरल्या आहेत.

* भारतीय ऑलिम्पिक महामंडळ [IOA] ने भारतीय मुष्टियुद्ध महासंघाला [IABF] देशामधील अधिकृत क्रीडा संघटना म्हणून मान्यता दिली आहे.

* ओडिशाच्या भुनेश्वरच्या कलिंगा क्रीडामैदानावर होणाऱ्या [हॉकी पुरुष विश्वचषक २०१८] चे बोधचिन्ह आणि कासवाच्या रूपात असलेले शुभंकर [मस्कट] याचे अनावरण करण्यात आले.

* भारतात खेळल्या जाणाऱ्या १४ व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण १७ देश भाग घेणार आहेत. ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ या काळात खेळली जाणार आहे.

* ब्रिटिश सरकारने एक रुपयाची नोट चलनात आणून गुरुवारी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या १०० वर्षात एक रुपयाच्या नोटेने पाचव्या जॉर्जच्या छायाचित्रापासून महात्मा गांधी, अशोक स्तंभापर्यंत प्रवास केला आहे.

* जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद तीन वर्षासाठी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी [PDP] च्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्या आहेत.

* पत्रकार ए. सूर्य. प्रकाश यांची प्रसार भारती बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०२० पर्यंत या पदावर राहतील.

* [लिपस्टिक अंडर माय बुरखा] या चित्रपटाला टिव ग्लोबल रिस्टनीबिलिटी फिल्म अवॉर्ड्स २०१७ चा पुरस्कार प्राप्त झाला.

* पुष्पा हिंगोरानी यांच्या रूपाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील ग्रंथालयात ६७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला वकिलाची प्रतिमा लावण्यात येणार आहे.

* दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भारण्याचीही सोय होणार आहे.

* ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरी कोम हिने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.

* क्रिकेटच्या मैदानातील योगदानाबद्दल युवराज सिंगला ग्वाल्हेर आयटीएम विद्यापीठाच्या वतीने [मानद डॉक्टरेट] पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

* डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिख्खू प्रज्ञानंद यांचे ३० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

* कोल्हापूर-गगनबावडा, करूळ घाट ते तळेरे या मार्गात समावेश १६६ जी या राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. आजपासून हा मार्ग अधिकृत राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.

* केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या [आयुष] उदयोग क्षेत्रात २०२० पर्यंत १० लाख प्रत्यक्ष आणि जवळपास दोन कोटी ५० लाखांची अप्रत्यक्ष रोजगार उपलब्द होणार आहे.

* देशातील हवा प्रदूषणाला अमेरिका जबाबदार भारतामध्ये दिल्लीसारख्या शहरांनी प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठलेली असताना अमेरिकेसारख्या मित्रदेशच भारताला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत आहे.

* महाराष्ट्र सरकारने नव्या इमारतींना परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने अधिकाऱ्यांना [राईट टू सर्व्हिस] कायदा लागू केला आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी आता ३० दिवसात मिळणार आहे.

* पश्चिम खोऱ्यातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यास मान्यता देण्याबरोबर गोदावरी खोऱ्यातील एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.