गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २९ डिसेंबर २०१७

अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २९ डिसेंबर २०१७

* हवाई संरक्षणासाठी भारताने अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी केली. यामुळे संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठी यशस्वी झेप घेणारा भारत लवकरच अंतराळ क्षेत्रातील ताकदवान देश बनणार आहे.

* या क्षेपणास्त्राची विशेष बाब ही आहे की, भारतीय सीमेच्या दिशेने डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची त्याची क्षमता आहे.

* ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची चाचणी भारताने या वर्षात केलेली तिसरी यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी आहे.

* या सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रामध्ये आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला भेदण्याची क्षमता आहे. या इंटरसेप्टर मिसाईलमुळे पृथ्वीच्या हवाई क्षेत्रात कक्षेत ३० किमी उंचीच्या आतून जाणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला निशाणा बनवत देशाच्या सीमेवर संभाव्य हल्ला रोखता येणार आहे.

* आपल्या लक्ष्याला थेट भेदण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी झाले असून ही मोठी बाब आहे. यापूर्वी भारताने याच श्रेणीतील दोन क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या अनुक्रमे ११ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी केल्या होत्या.

* आजची चाचणी ही इंटरसेप्टरमुळे विविध कामाच्या तपासनीसाठी करण्यात आले होती. जी पूर्णपणे यशस्वी चाचणी झाली आहे.

* हे क्षेपणास्त्र ७.५ मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट मिसाईल आहे. जे रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात आले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.