सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

माजी नौदल अधिकारी कुलभूषण प्रकरण - २६ डिसेंबर २०१७

माजी नौदल अधिकारी कुलभूषण प्रकरण - २६ डिसेंबर २०१७

* हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा त्यांच्या आई व पत्नीशी भेट घडवून आणल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मांडले.

* [कुलभूषण प्रकरण]

* कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती.

* कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारताच्या [रॉ] साठी काम करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

* कुलभूषन जाधव हे पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोप पाकिस्तानने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

* ४९ वर्षीय कुलभूषण जाधव हे नौदलातील अधिकारी होते. १४ वर्षे सेवा केल्यानंतर २००३ मध्ये त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली आणि व्यवसायानिमित्त ते इराणला गेल्याचा दावा भारताने केला होता.

* पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने १० एप्रिल २०१७ रोजी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवताना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

* १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीला स्थगिती दिली होती. याप्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीला स्थगिती दिली होती.

* याप्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकिस्तानला बजावले होते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.