सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदराचे उदघाटन - ५ डिसेंबर २०१७

इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदराचे उदघाटन - ५ डिसेंबर २०१७

* भारताने इराणमध्ये विकसित केलेल्या चाबहार या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते झाले.

* या बंदरामुळे पाकिस्तानला वळसा घालून इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापारासाठी वाहतुकीसाठी नवा मार्ग खुला होणार आहे.

* तसेच या बंदरामुळे मध्य आशियातील देशांशी व्यापारही आता वेगाने आणि अधिक सुकर होणार आहे. इराणच्या आखातात होमुर्झच्या समुद्रधुनीच्या तोंडावर वसलेले चाबहार हे बंदर भारतासाठी व्यापारी तसेच उपयुक्त ठरणार आहे.

* या बंदराची माल हाताळण्याची क्षमता पूर्वी वर्षाला २.५ दशलक्ष टन इतकी होती. आता ती वर्षाला ८.५ दशलक्षटन इतकी वाढविण्यात आली आहे.

* चाबहार बंदरामुळे एक मोठा फायदा म्हणजे मध्यपूर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्द होणार आहे.

* चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमुल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे आयातमुल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर, व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.