रविवार, १० डिसेंबर, २०१७

प्रदूषणमुक्त शहरांसाठी जगात ई-मोबिलिटी, सार्वजनिक वाहतुकीस पुढाकार - ११ डिसेंबर २०१७

प्रदूषणमुक्त शहरांसाठी जगात ई-मोबिलिटी, सार्वजनिक वाहतुकीस पुढाकार - ११ डिसेंबर २०१७

* वायुप्रदूषण रोखण्यासाठी सुरक्षित, सोईस्कर आणि स्वस्त दरात सार्वजनिक वाहतूक, सायकल चालविण्यास प्राधान्य याबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी डिझेल वाहनावर आगामी काळात बंदी आणण्यासंदर्भात धोरणांची आखणी केली जात आहे.

* हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जगभरात दरवर्षी जवळपास ४० लाख नागरिकांचा मृत्यू होत असेल तर जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

* जगभरातील प्रदूषण रोखण्यासाठी केलेले उपाय

* नेदरलँडमध्ये सर्व प्रकारच्या पेट्रोल व डिझेल वाहनांच्या विक्रीवर २०२५ पर्यंत बंदी आणण्याचा विचार राजकीय वर्तुळात सुरु आहे.

* केवळ इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनच्या साहाय्याने वाहने चालविण्यात यावीत. तसेच सायकल चालविण्यावर भर देण्यात यावा.

* जर्मनीमधील फ्रीबर्गमध्ये ५०० किलोमीटरचा रस्ता हा केवळ दुचाकी ट्राम आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्द करून देण्यात आला आहे.

* चारचाकी वाहन खरेदी न करता जीवन जगणाऱ्या नागरिकांना सरकारतर्फे स्वस्त घरे, विनामूल्य सार्वजनिक वाहतूक आणि सायकल दिल्या जातात.

* फ्रान्समधील पॅरिससारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या पर्यटनस्थळी विकेंडला कारबंदी आहे. समविषम वाहनांना दिवसाआड बंदी, प्रदूषण अधिक झाल्यास सार्वजनिक वाहतूक मोफत देण्याचा किंवा कार आणि दुचाकी शेअरिंगचा उपक्रम राबविला जाणार आहे.

* माद्रीत, अथेन्स, मेक्सिको शहरांची २०२५ पर्यंत डिझेलकारवर बंदीची तयारी.

* भारतात २०३० पासून डिझेल व पेट्रोल कारवार बंदी आणण्यासाठी सरकारची तयारी. फक्त इलेक्ट्रिक कार वापरण्यास पुढाकार देणार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.