शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

सर्वात कमी सुट्टी घेणाऱ्याच्या यादीत भारतीय पाचव्या स्थानी - २३ डिसेंबर २०१७

सर्वात कमी सुट्टी घेणाऱ्याच्या यादीत भारतीय पाचव्या स्थानी - २३ डिसेंबर २०१७

* पर्यटन करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकजण भारतीय आज जगभरात पर्यटनासाठी भटकताना दिसतात. मात्र एक्सपीडीया या ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीच्या वार्षिक सर्वेक्षणात भारतीय लोक हक्काच्या सुट्ट्या घेण्यात पिछाडीवर आहेत.

* सर्वात कमी सुट्ट्या घेणाऱ्या देशांच्या यादीत भारत ५ व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये दक्षिण कोरिया, मलेशिया, हॉंगकॉंग, आणि फ्रान्स हे चारच देश पुढे आहेत.

* द २०१७ व्हेकेशन डिप्रेशन नावाने करण्यात आलेल्या वार्षिक जगभरातील वेगवेगळ्या देशामधील लोक कशासाठी आणि कशा पद्धतीने सुट्ट्या याबद्दलचा अभ्यास करण्यात आला आहे.

* या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ६७% भारतीयांनी कार्यालयातील कामासाठी नियोजित सुट्ट्या रद्द केल्या किंवा पुढे ढकलल्या.

* ५५% भारतीय कार्यालयात बरेच काम असल्याने गरजेपेक्षा कमी दिवस सुट्ट्या घेता येत नसल्याचे दिसून आले. तर २८% भारतीयांना कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे भटकण्यासाठी सुट्टी घेता येत नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.