सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाचे १८ वे अध्यक्ष - १२ डिसेंबर २०१७

राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाचे १८ वे अध्यक्ष - १२ डिसेंबर २०१७

* बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर आज अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबत घोषणा केली.

* राहुल गांधी यांची बिनविरोध निवडण्यात आल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं. राहुल गांधी येत्या १६ डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील.

* काँग्रेसअध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ९०० सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास ९० अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होते.

* सोनिया गांधी सलग १९ वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

* काँग्रेस पक्षाचे क्रमशः अध्यक्ष - आचार्य कृपलानी १९४७, पट्टाभी सितारमय्या १९४८-४९, पुरुषोत्तम टंडन - १९५०, जवाहरलाल नेहरू १९५१-५४, यु एन धेबर १९५५-५९, इंदिरा गांधी १९५९, नीलम संजीव रेड्डी १९६०-६२, के कामराज १९६४-६७, निजलिंगअप्पा १९६८, जगजीवनराम १९७०-७१, शंकर दयाळ शर्मा १९७२-७४, देवकांत बरुआ १९७५-७७, इंदिरा गांधी १९७८-८४, राजीव गांधी १९८५-९१, पी व्ही नरसिंहराव १९९२-९६, सीताराम केसरी १९९६-९८, सोनिया गांधी १९९८-२०१७, राहुल गांधी २०१७ पासून.

* राहुल गांधी यांचा परिचय

* राजीव आणि सोनिया गांधी यांचे पुत्र असलेल्या राहुल यांचा जन्म १९ जून १९७० रोजी नवी दिल्लीत झाला.

* नवी दिल्लीतील मॉर्डन स्कुलमध्ये शिकलेल्या राहुल यांचे बहुतांश शिक्षण घरीच झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून चार वर्षाचा अर्थशास्त्रातील एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला.

* फ्लोरिडातील रोलिन्स महाविद्यालयातून १९९४ मध्ये त्यांनी बीएची पदवी संपादन केली. केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून इकॉनॉमी मध्ये एम फीलची पदवी प्राप्त केली.

* सध्या राजीव गांधी फाउंडेशन, जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, संजय गांधी मेमोरियल ट्रस्ट, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, राजीव गांधी कॉम्पुटर शिक्षा केंद्र अशा अनेकविध संस्थांवर ते कार्यरत आहेत.

* राजकीय कारकीर्द

* २००४ मध्ये अमेठीमधून लोकसभेवर निवड. काँग्रेसच्या सभांमध्ये सहभाग. २००६ राहुल गांधी प्रियांका या दोघांनी रायबरेली मतदारसंघात कार्यरत राहुलने प्रचाराची धुरा सांभाळली.

* २००७ युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि नॅशनल स्टुडन्ट्स युनियन ऑफ इंडिया चे अध्यक्षपद झाले. २००८ साली युवक काँग्रेस आणि एनएसयूआय च्या सदस्यांची संख्या २ लाखावरून २५ लाखावर गेली.

* २००९ अमेठीची जागा राहुल यांनी राखली, उत्तर प्रदेशातील ८० पैकी २० जागा काँग्रेसने जिंकल्या. ११ मे २०११ उत्तर प्रदेशातील भट्टा परसूला खेड्यात आलेल्या राहुल गांधी यांनी महामार्ग जमिनी जात असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ भूमिका घेत अधिक मोबदल्याचा आग्रह धरला.

* २०१२ उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोनशेवर सभा. काँग्रेसने २८ जागा जिंकल्या. १९ जानेवारी २०१३ जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षाची निवड झाली.

* २०१४ साली राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले, परंतु काँग्रेसची सत्ता गेली. २०१६ रा. स्व. संघाने महात्मा गांधी हत्या घडवली, या राहुल यांनी केलेल्या आरोपाबद्दल संघाने त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला.

* २०१७ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.