बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

संगीत क्षेत्रांतील तानसेन पुरस्कार पंडित कशाळकर यांना जाहीर - ७ डिसेंबर २०१७

संगीत क्षेत्रांतील तानसेन पुरस्कार पंडित कशाळकर यांना जाहीर - ७ डिसेंबर २०१७

* संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

* कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा, आणि जयपूर या घराण्याच्या गायनपद्धतीवर हुकूमत असणारे गवई आहेत.

* त्यांनी संगीताचे सुरवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.

* नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.

* तसेच त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात १९८३ ते १९९० दरम्यान काम केले. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.