गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

ज्येष्ठ आयुर्वेदतज्ञ वैदय खडीवाले यांचे निधन - २९ डिसेंबर २०१७

ज्येष्ठ आयुर्वेदतज्ञ वैदय खडीवाले यांचे निधन - २९ डिसेंबर २०१७

* आयुर्वेद सर्वांकरिता हा विचार घेऊन आयुष्यभर झटणारे, आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार, आणि संशोधनात गढून गेलेले ज्येष्ठ आयुर्वेदतज्ञ परशुराम यशवंत तथा प. य. वैदय खडीवाले वय ८६ यांचे निधन झाले.

* खडीवाले यांचा जन्म पुण्यातच १९३२ साली झाला. भारतीय हवाई दलात १७ वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ मध्ये ते निवृत्त झाले.

* त्यानंतर मिळणारी पेन्शन नाकारून अष्टांग आयुर्वेदाचे शिक्षण घेऊन वडील यशवंत हरी वैदय यांचा औषध निर्माणाचा मोठा व्याप सांभाळायला सुरवात केली.

* या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९४७ मध्ये खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेची स्थापना केली. त्यांनी पुण्यात हरी परशुराम औषधालय आणि आयुर्वेदिक औषध भांडार सुरु केले.

* त्यांचे 'आयुर्वेद सर्वांसाठी' हे पुस्तक गाजले. १९८२ साली 'जनकल्याण रक्तपेढी' आणि १९८८ मध्ये 'जनकल्याण नेत्रपेढी' सुरु करण्यात आली.

* त्यांना महत्वाचा दिल्लीतील अ. भा. आयुर्वेद महासंमेलनात 'शताब्दी महर्षी' म्हणून गौरव, तसेच महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे 'आयुर्वेद भूषण पुरस्कार', केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पहिला 'राष्ट्रीय धन्वन्तरी पुरस्कार' भेटले. त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी.लीट पदवी प्रदान.

* निवडक ग्रंथसंपदा - आयुर्वेद सर्वासाठी, आयुर्वेदीय उपचार, आयुर्वेदीय औषधी, ए टू झेड आरोग्यवर्धिनी, औषधाविना उपचार, कानाचे विकार, निरामय सौन्दर्य आणि आयुर्वेद, पूर्णब्रह्म, सहज सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.