शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

ई-वे बिल यंत्रणा १ जूनपासून चालू करणार - १७ डिसेंबर २०१७

ई-वे बिल यंत्रणा १ जूनपासून चालू करणार - १७ डिसेंबर २०१७

* अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली.

* त्यात ई-वेबिल पद्धती सुरु करण्यासाठीची संगणक यंत्रणा [सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर] तयार आहे की नाही याचा आढावा घेतला गेला.

* देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी मूल्यवर्धित कर [व्हॅट] अधिकाऱ्याकडून वाहतूकदारांना माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठीचा परवाना दिला जात आहे.

* जीएसटी लागू झाल्यापासून त्या यंत्रणेत बदल करून हा परवाना प्रत्यक्ष कागद स्वरूपात देण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात [ई-वे बिल] देण्याचे ठरले. मात्र त्यासाठी आवश्यक ती संगणक यंत्रणा तयार आहे की नाही ते तपासणे आवश्यक होते.

* देशव्यापी ई-वे बिल यंत्रणा १६ जानेवारी २०१८ पर्यंत प्रायोगिक तत्वावर वापरण्यास तयार असेल. असे अर्थ खात्याच्या पत्रकात म्हटले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.