सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन - ५ डिसेंबर २०१७

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन - ५ डिसेंबर २०१७

* ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक शशी कपूर [वय-७९] यांचे दीर्घ आजाराने अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले.

* त्यांच्या मागे दोन मुलगे आणि संजना ही मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी सांताक्रुज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

* हिंदी चित्रपट सृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरवात करणाऱ्या शशी कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले.

* अभिनेत्री नंदाबरोबर त्यांची जोडी विशेष गाजली. [चार दिवारे] हा नंदा आणि त्यांचा पहिला चित्रपट आहे.

* [ शशी कपूर - जीवनपरिचय व कार्य ]

* शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. सिनेसृष्टीचे पितामह पृथ्वीराज कपूर त्यांचे वडील. राज कपूर आणि शम्मी कपूर हे दोन भाऊ.

* १९६१ साली आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदाच नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून ११६ चित्रपटामध्ये काम केले.

* शशी कपूर यांची गाजलेले चित्रपट - जब जब फुल खिले, हसीना मन जाएगी, शर्मिली, चोर मचाए शोर, दीवार, प्रेम कहाणी, चोरी मेरा काम, कभी-कभी, फकिरा, सत्यम शिवम सुंदरम, त्रिशूल, दुनिया मेरे जेब मे, काला पत्थर, सुहाग, शान, सिलसिला, नमक हलाल हे त्यांची गाजलेली चित्रपटे.

* पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहंमद अली जिना यांच्या जीवनावरील जिन्ना या चित्रपटात काम केले होते. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

* शशी कपूर यांना ३ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर १९७९ मध्ये जुनून या त्यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

* तर १९९४ मध्ये [मुहाफिज] या चित्रपटाचा स्पेशल ज्युरी अवॉर्डने गौरविण्यात आले. २०१४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी २०११ मध्ये शशी कपूर यांचा भारत सरकारने पदमभूषण प्रदान करून गौरव केला होता.

* २०१४ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार शशी कपूर यांना बहाल करण्यात आला होता.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.