गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

आयओएच्या अध्यक्षपदावर नरिंदर बात्रा यांची निवड - १५ डिसेंबर २०१७

आयओएच्या अध्यक्षपदावर नरिंदर बात्रा यांची निवड - १५ डिसेंबर २०१७

* आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे [एफआयएच] प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनच्या आयओएच्या अध्यक्षपदावर चार वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे.

* राजीव मेहता यांची सरचिटणीस या पदावर निवड झाली आहे. आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवड्यात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असून अध्यक्षपदासाठी बात्रा यांची निवड केली.

* भारतीय वेटलिफ्टींग महासंघाचे अध्यक्ष बिरेंद्र बैश्य हे सुद्धा सुरवातीला अध्यक्षपदासाठी उत्सुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली.

* अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०३२ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, २०३० च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या भारताच्या यजमानपदाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.