सायलेन्स ब्रेकर सर्वात प्रभावशाली चळवळ टाइम्सचा गौरव - ७ डिसेंबर २०१७
* टाइम नियतकालिकाने यंदा [पर्सन ऑफ द इयर] म्हणून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या [सायलेन्स ब्रेकर] ची निवड केली आहे.
* लैंगिक छळ आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या असंख्य व्यक्तींना टाइमने हा बहुमान दिला आहे. हॉलिवूडमधील चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टाईन यांच्याविरोधात अनेक महिलांनी लैंगिक छळाने आरोप केले होते.
* या महिलांनी आवाज उठवल्यांनतर विविध क्षेत्रातील महिलांनी पुढे येत त्यांच्यावरील लैंगिक छळाचे प्रकार जाहीरपणे मांडले आहेत.
* यासाठी हा #ME TOO हॅशटॅग सुरु झाला होता. अनेक देशामध्ये स्थानिक भाषांमध्येही हॅशटॅग सुरु झाला होता. जगभरातील अनेक देशामधील महिलांनी यानिमित्ताने लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा