मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

२०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकणार - २७ डिसेंबर २०१७

२०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकणार - २७ डिसेंबर २०१७

* आगामी भारतीय वर्षात अर्थव्यवस्था विकासदराच्या बाबतीत [जीडीपी] ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बडया देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

* 'द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' ने [सीईबीआर] यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्द होऊंन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल.

* याशिवाय आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वरच्या स्थानावर असेल. या एकूण परिस्थितीमुळे आगामी १५ वर्षात जगातील आघाडीच्या १० अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशाचे वर्चस्व असेल.

* भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या तात्पुरत्या स्वरूपाचे धक्के बसत आहेत. सध्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास काहीसा मंदावला आहे.

* मात्र तरीही २०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.

* २०३२ पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मात्र अमेरिका आपले दुसरे स्थान अबाधित ठेवेल.

* तर ब्रेग्झिटच्या धक्क्यातून सावरत असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था २०२० पर्यंत पुन्हा फ्रान्सला मागे टाकेल. तर रशियाचे जागतिक बाजारपेठेतील स्थान आणखी घसरेल.

* खनिज तेलाच्या कमी किमतीला सरावलेली रशिया ऊर्जा क्षेत्रावरच मोठया प्रमाणावर अवलंबून राहील. मात्र त्यामुळे नुकसान होऊन रशियाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून १७ व्या स्थानापर्यंत खाली घसरेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.