शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

हिंदी साहित्य अकादमीचा रेखा बैजल यांना पुरस्कार - ९ डिसेंबर २०१७

हिंदी साहित्य अकादमीचा रेखा बैजल यांना पुरस्कार - ९ डिसेंबर २०१७

* महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीतर्फे दिला जाणारा [जैनेंद्रकुमार जैन उपन्यास पुरस्कार] साहित्यिक रेखा बैजल यांना जाहीर झाला आहे.

* बैजल यांच्या [मौत से जिंदगी की ओर] या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

* बैजल यांनी आतापर्यंत पस्तीसहुन अधिक पुस्तके लिहिली आहेत. कादंबरी प्रकारामध्ये त्यांनी पाणीप्रश्नावर [जलपर्व] दुसऱ्या महायुद्धातील [प्रलयांकर] आणि तिसऱ्या महायुध्दावरील 'अग्निपुष्प' अशा दहा कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

* 'स्वतःहून उगवताना' हा त्यांचा मराठीतील कवितासंग्रह असून 'अब तो जिया जाये ना' हा हिंदी कवितासंग्रह आहे. बैजल म्हणाल्या मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले पण हा खूप महत्वाचा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.