शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

आयटीएफ कडून नदाल, मुगुरुझा विश्वविजेते घोषित - १० डिसेंबर २०१७

आयटीएफ कडून नदाल, मुगुरुझा विश्वविजेते घोषित - १० डिसेंबर २०१७

* स्पेनचे टेनिसपटू राफेल नदाल आणि गार्बेनी मुगुरुझा यांची शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे [आयटीएफ] विश्व विजेते म्हणून घोषणा करण्यात आले.

* तब्बल १९ वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच यावेळी एकाच देशाच्या पुरुष महिला टेनिसपटूंची आयटीएफ विश्वविजेते म्हणून निवड करण्यात आली.

* स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत तिसऱ्यांदा हा बहुमान मिळविला आहे.

* नादालने १० व्यांदा फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. नादालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत १६ ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली.

* ३१ वर्षीय नदाल सध्या २०१७ च्या टेनिस हंगामाअखेर एटीपी मानांकनात पहिल्या स्थानावर आहे. स्पेनची मुगुरुझा हिने पहिल्यांदाच आयटीएफचे विश्व विजेतेपद पटकाविले आहे.

* तिने चालू वर्षीच्या टेनिस हंगामात विम्ब्लडन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून २०१७ च्या टेनिस हंगामाअखेर मुगुरुझाने डब्लूटीए मानांकन यादीत दुसरे स्थान राखले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.