बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

कैलास कणसे बार्टीचे महासंचालक - २८ डिसेंबर २०१७

कैलास कणसे बार्टीचे महासंचालक - २८ डिसेंबर २०१७

* डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या [बार्टी] महासंचालकपदी भारतीय पोलीस सेवेतील [आयपीएस] अधिकारी कैलास कणसे यांची नियुक्ती झाली आहे.

* मूळचे औरंगाबादचे येथील कणसे १९९५ केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी महाराष्ट्रात अकोला, अकोट, हिंगोली, नाशिक ग्रामीण, यवतमाळ अशा विविध पदावर काम केले आहे.

* हिंगोली आणि भंडारा येथे पोलीस अधीक्षक, नागपूर शहर पोलीस उपायुक्त, गडचिरोली येथे राज्य राखीव दलाचे समादेशक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

* कणसे यांना राज्य शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, नक्षलग्रस्त भागात काम केल्याबद्दल विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे.

* बार्टीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यावर तसेच स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर देणार असल्याचे यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.