शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

टी-२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या - २३ डिसेंबर २०१७

टी-२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या - २३ डिसेंबर २०१७

* काल झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाची करत श्रीलंकेसमोर २६० धावसंख्येचे विक्रमी आव्हाहन दिले आणि मालिका आपल्या ताब्यात घेतली.

* आतापर्यंत टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमध्ये रचलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावसंख्येत रोहित शर्माने ११८ धावांची विक्रमी खेळी तसेच के एल राहुलने ८९ धावा काढल्या.

* रोहित शर्माने ११८ धावा काढत दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने केलेल्या ३५ चेंडूत शतक केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

* तसेच अवघ्या ३५ बॉलमध्ये सेंच्युरी लगावत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम के एल राहुल याच्या नावावर होता.

* टी-२० आयपीएल क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने शतक करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरोधात ३० चेंडूत शकत केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.