शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

मुंबईत सिप्लेनची यशस्वी चाचणी - १० डिसेंबर २०१७

मुंबईत सिप्लेनची यशस्वी चाचणी - १० डिसेंबर २०१७

* नागपूर आणि गुवाहाटी येथे यशस्वी चाचणी घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील गिरगाव चौपाटीवर १४ आसनी सागरी विमानाची शनिवारी चाचणी घेण्यात आली.

* देशात ७५०० किलोमीटरचा सागरी किनारा १११ नद्या, तलाव, जलाशये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचे रूपांतर वॉटर पोर्टमध्ये करण्यात येईल. अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.

* सीप्लेनसाठी ३०० मीटर धावपट्टीची गरज भासते, त्यामुळे तांत्रिक बाबी सोयीच्या आहेत. या सेवेसाठी जेट्टीची गरज असून ती कमी वेळेत बांधता येते.

* सागरी विमानामुळे प्रादेशिक शहर जोडणीला हातभार लागणार आहे. भविष्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पूर्वांचलातील काही प्रदेश, अंदमान, लक्षद्वीप, आणि इतर समुद्रकिनारी भागात विमानसेवा सुरु केली जाईल.

* जपानची सेतेउची कंपनी अशी विमाने पुरविते. त्यांच्या सहकार्याने स्पाईसजेट देशातील जलवाहतूक पर्यायाची तपासणी करत आहे.

* अशी वाहतूक व्यवस्था सध्या कॅनडा, अमेरिका, आणि युरोपात सुरु आहे. तेथील नियमांचा अभ्यास करून भारतातून ३ महिन्यात तशी नियमावली तयार केली जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.