शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

एडीबीच्या मते पुढील वर्षी भारताचा विकासदर ६.७% राहील - १६ डिसेंबर २०१७

एडीबीच्या मते पुढील वर्षी भारताचा विकासदर ६.७% राहील - १६ डिसेंबर २०१७

* नोटबंदी, वस्तू व सेवा कर या आव्हानासोबत कृषी क्षेत्रातील जोखीम गृहीत धरून आशियाई विकास बँकेने [एडीबी] भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दराचा अंदाज खालावला आहे.

* आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने चालू आर्थिक वर्षात देशाच्या प्रगतीचा दर आता ६.७% असेल. असे नमूद केले बँकेचा यापूर्वीचा अंदाज ७% होता.

* आंतरराष्ट्रीय बाजारात खनिजतेलाचे दर २०१८ मध्ये पुन्हा उचल खाण्याची शक्यताही विकास दर अंदाज खुंटविण्यास निमित्त ठरली आहे.

* आशियाई विकास बँकेने २०१८-१९ या पुढील वित्त वर्षातील भारताच्या विकास दराचा अंदाजही आधीच्या ७.४% टक्क्यावरून खाली आणला आहे.

* गेल्या वर्षातील नोटबंदी, नवीन अप्रत्यक्ष करप्रणाली अर्थव्यवस्था तूर्त सावरणे अवघड असल्याचे बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेने भारताचा विकास दर ७.२% वरून ७% वर आणला.

* फीच व मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकनात संस्थांनी यापूर्वीच भारताच्या वाढत्या विकास दराबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.