मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

परदेशातील स्थलांतराच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर - २० डिसेंबर २०१७

परदेशातील स्थलांतराच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर - २० डिसेंबर २०१७

* परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत.

* त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे. असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे. मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन, या देशांचे लोक त्या खालोखाल मोठ्या प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत.

* त्यांची संख्या ०.६ ते १.१ कोटी आहे. असे २०१७ च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहत आहेत.

* रशियाचे १.१, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.

* भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिराती तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत.

* सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहत आहेत. त्यांचे प्रमाण इ. स. २००० पासून ४९% वाढले आहे.

* आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे. विश्वसार्ह माहिती व पुराव्यांच्या आधारेच स्थलांतराबाबतचे गैरसमज दूर करून स्थलांतर धोरण ठरविणे गरजेचे आहे.

* स्थलांतरामुळे काही देशात लोकसंख्या वाढली असून, तेथे लोकसंख्या कमी असण्याचा कल बदलला आहे. २००० ते २०१५ दरम्यान उत्तर अमेरिकेत लोकसंख्यावाढीचा दर ४२% होता तर ओशियानात तो ३१% होता. युरोपात २००० ते २०१५ दरम्यान स्थलांतराअभावी लोकसंख्या कमी झाली आहे.

* असा अहवाल  संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक उपमहासचिव लिऊ झेनमिन यांनी सांगितले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.