शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये सलमान खान अव्वल - २३ डिसेंबर २०१७

भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये सलमान खान अव्वल - २३ डिसेंबर २०१७

* फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भरतीय सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेता सलमान खानने पाहिलं स्थान कायम राखलं आहे.

* ५१ वर्षीय सलमान खान वार्षिक २३२ कोटी रूपयासह सेलिब्रेटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानावर शाहरुख खान १७० कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानावर व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली १०० कोटीसह  तिसऱ्या क्रमांकावर आहे.

* पहिल्या तीन क्रमांकावरील सेलिब्रेटी आपापल्या स्थानी कायम असले तरीही यंदा त्यांच्या कमाईत २० टक्क्यांनी घट झाल्याची नोंद झाली आहे.

* तसेच पुढील यादी अनुक्रमे अक्षय कुमार ९८ कोटी, सचिन तेंडुलकर ८२ कोटी, अमीर खान ६८ कोटी, प्रियांका चोप्रा ६७ कोटी, महेंद्रसिंग धोनी ६३.७७ कोटी, हृतिक रोशन ६३ कोटी, रणवीर सिंग ६२ कोटी स्थानावर आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.