शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्रात १६ नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होणार - ९ डिसेंबर २०१७

महाराष्ट्रात १६ नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होणार - ९ डिसेंबर २०१७

* मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होणार आहेत. अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

* देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ पासपोर्ट केंद्र सुरु होणार आहेत.

* सध्या यातील ४ पासपोर्ट केंद्र सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड येथे सुरु करण्यात आली आहेत. उर्वरित १६ पासपोर्ट केंद्र लवकरच कार्यंवित केली जातील.

* महाराष्ट्रत जी नवीन १६ पासपोर्ट केंद्रे कार्यलये सुरु केली जातील ती पुढीलप्रमाणे आहेत - सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, घाटकोपऱ, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड, जळगाव या ठिकाणी केंद्रे उघड्यात येणार आहेत यामुळे महाराष्ट्रात पासपोर्ट सेवा केंद्राची संख्या २७ होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.