सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

कर्णबधिरत्व दूर करण्यासाठी जनुकीय प्रयोग यशस्वी - २६ डिसेंबर २०१७

कर्णबधिरत्व दूर करण्यासाठी जनुकीय प्रयोग यशस्वी - २६ डिसेंबर २०१७

* हळूहळू वाढत जाणारे कर्णबधिरत्व दूर करण्यासाठी जनुकीय संपादन तंत्राचा उपयोग होत असल्याचे उंदरावरील प्रयोगात दिसून आले. त्यात कर्णबधिरत्व टाळता येते.

* माणसातही कर्णबधिरत्व ज्या जनुकांमुळे येते त्याचे संपादन केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. अमेरिकेतील हावर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट डेव्हिड लिऊ यांनी सांगितले आहे की, जनुकीय संपादनाचा वापर प्राण्यांमधील कर्णबधिरत्व दूर करण्यासाठी प्रथमच केला गेला आहे.

* याबाबत प्रयोग उंदरांमध्ये यशस्वी झाला असून तो माणसात यशस्वी होण्याची शक्यता आहे. लिऊ यांनी सांगितले की या तंत्राने एक दिवस माणसातले कर्णबधिरत्व दूर करता येईल यात शंका नाही.

* कर्णबधिरत्वच्या निम्म्या रुग्णामध्ये जनुकीय कारणे असतात. त्यात इतर उपचारांना मर्यादा आहेत. जनुकीय उत्परिवर्तनाने कर्णबधिरत्व येत असते. ते दूर करणे अवघड  असते.

* कर्णबधिरत्वशी टीएमसी १ हा जनुक संबंधित असतो. त्यातील एका चुकीमुळे आंतरकर्णातील बारीक केसांच्या पेशी कमी होतात व त्यामुळे ऐकू कमी येते.

* टीएमसी १ जनुकांमुळे बहिरेपणा येत जातो. उंदरातील बिथोव्हेन या जनुकांची उत्परिवर्तित आवृत्ती काढून टाकली तर श्रावणक्षमता सुधारते.

* आंतरकर्णातील बारीक केस एकदा खराब झाले की पुर्ववत करता येत नाहीत. पण जनुकीय संपादनाने ते शक्य होते त्यामुळे श्रवण पुर्वव्रत करता येते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.