गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

भारतात केवळ २९% महिला इंटरनेट वापरतात - १५ डिसेंबर २०१७

भारतात केवळ २९% महिला इंटरनेट वापरतात - १५ डिसेंबर २०१७

* सध्या इंटरनेट हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. मात्र तरीही आपल्या देशात इंटरनेट वापरण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर आहेत.

* संयुक्त राष्ट्राच्या अध्ययनानुसार भारत केवळ २९% महिला इंटरनेट वापरतात. स्टेट ऑफ द चिल्ड्रेन २०१७ चिल्ड्रेन इन या डिजिटल रिपोर्टनुसार, ग्रामीण भागात महिलावर अनेक प्रकारची बंधने असतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे लिंगभेद.

* या अहवालानुसार जगभरात २०१७ मध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषाची संख्या १२% अधिक आहे. भारताच्या पुरुषाच्या तुलनेत महिलांची संख्या एक तृतीयांश कमी आहे.

* मात्र डिजिटल जगापासून मुलींना दूर ठेवण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. असे अहवालात म्हटले आहे. काही दिवसापूर्वी इंटरनेट स्पीडचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेने ओपन सिंग्नलचे नवे रिपोर्ट सादर केले होते.

* त्यात ४जी एलटीई स्पीडमध्ये भारत ७७ देशांचं यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. भारतात ४ जी स्पीड ६.१३ एमबीपीएस आहे. जगाचा विचार केला तर आपल्याला ४ जी मध्ये ३ जी स्पीड मिळत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.