सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रकल्प नागपुरात होणार - १२ डिसेंबर २०१७

पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रकल्प नागपुरात होणार - १२ डिसेंबर २०१७

* पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे.

* ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरु होईल. अशी माहिती पतंजली आयुर्वेद प्रबंध संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिली.

* या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता दर दिवशी ८०० टन [४०ट्रक] राहील. या प्रकल्पात संत्र्याचा ज्यूस तर तयार होईलच पण सालीपासून तेल काढले जाईल. व उरलेल्या चोथ्यापासून सुयोग्य उपयोग केला जाईल.

* याचबरोबर दररोज ६०० टन क्षमता असलेला खादय-प्रक्रिय्य प्रकल्पही मिहान सेझमध्ये आणत आहोत. यात आवळा, टमाटे,अलोव्हेरा, कोरफड, व इतर फळावर प्रक्रिया करून पॉवर विटा, ग्लुकोज, न्युडल्स, ब्रेड, बिस्कीट, इत्यादी पदार्थ तयार केले जातील.

* या दोन्ही प्रकल्पामध्ये जागतिक गुणवत्ता मानकांचे उदा -यूएसएफडीए, युरोपियन युनियन, यांचे मानके काटेकोर पालन करून निर्यातही केली जाईल.

* या दोन्ही प्रकल्पामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी तसेच इतर सर्व लोकांना रोजगार मिळून, योग्य मोबदला मिळेल. व भागाचा विकास होईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.