शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांची आयसीसीआरच्या अध्यक्षपदी नियुक्ती - ३० डिसेंबर २०१७

डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांची आयसीसीआरच्या अध्यक्षपदी नियुक्ती - ३० डिसेंबर २०१७

* इंडियन कौंसिल ऑफ कल्चरल रिलेशन या देशातल्या प्रतिष्टीत संस्थेच्या अध्यक्षपदी भापजपचे राज्यसभेचे खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड करण्यात आली आहे.

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आज या नियुक्तीच पत्र जारी करण्यात आलं. देशाच्या सांस्कृतिक इतिहासातली ही अतिशय मानाची संस्था आहे.

* १९५० मध्ये स्वतंत्र भारताचे शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कल्पनेतून ही संस्था स्थापन झाली होती. भारताचे इतर राष्ट्रांशी सांस्कृतिक बंध अधिक मजबूत करण्याचं काम ही संस्था करते.

* अटलबिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंहराव, शंकर दयाळ शर्मा, डॉ करण सिंह यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींनी या संस्थेच अध्यक्षपद भूषविले आहे.

* २००५ ते २०१४ इतक्या दीर्घ काळासाठी डॉ करण सिंह यांनी हे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर २०१४ पासून हे पद रिक्त होते. राष्ट्रपती आज सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली.

* यशवंतराव चव्हाण, वसंत साठे यांच्यानंतर हे पद संभाळणारे विनय सहस्त्रबुद्धे हे तिसरे व्यक्ती होत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.