सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजप विजयी - १९ डिसेंबर २०१७

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजप विजयी - १९ डिसेंबर २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या गुजरात विधानसभेच्या रणसंग्रामात १८२ जागेपैकी ९९ जागेवर भाजप पक्ष विजयी झाला, तर ७७ जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या, ६ जागा अपक्षाला मिळाल्या.

* तसेच हिमाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभेच्या रणसंग्रामात ६८ जागेपैकी ४४ जागा भाजप, २१ जागा काँग्रेस, तर ३ जागा अपक्षाला मिळाल्या.

* हिमाचल प्रदेश मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्याने येथे पक्षाची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली.

* गुजरात राज्यामध्ये १९९८ पासून भाजप पक्ष सत्तेवर होता आता अजूनही ५ वर्ष गुजरातमध्ये अजूनही सत्ता मिळाली आहे.

* हिमाचल प्रदेशात १९९० पासून दर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजप आणि काँग्रेस यांना आलटून पालटून सत्ता दिलेली दिसते.

* या विजयामुळे भाजपाची सत्ता आता १९ राज्यात आलेली आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, नागालँड या राज्यात भाजप सरकारची सत्ता आहे.

* तर काँग्रेसची सत्ता केवळ ५ राज्यात आहे, पंजाब, कर्नाटक, मेघालय, मिझोराम, पुडुचेरी. तर इतर प्रादेशिक पक्षाची सत्ता ७ राज्यात आहे, केरळ, तामिळनाडू, तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, दिल्ली या राज्यात आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.