रविवार, १७ डिसेंबर, २०१७

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना ३ वर्षाची शिक्षा - १८ डिसेंबर २०१७

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना ३ वर्षाची शिक्षा - १८ डिसेंबर २०१७

* कोळसा गैरव्यवहारप्रकरणी भ्रष्ट्राचार तसेच अन्य आरोपासाठी दोषी ठरविलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय विशेष न्यायालयाने आज तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. 

* कोडा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऑल इंडिया झारखंड स्टुडंट युनियन म्हणून झाली होती. यापूर्वी ते खाणीत मजुरी करत होते. 

* राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असताना त्यांचा परिचय झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्याशी झाला. व २००० मध्ये जगन्नाथपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले. 

* मुख्यमंत्री झाल्यावर मधू कोडा यांनी खाण मंत्रालय, ऊर्जा साहित्य व अन्य महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. यानंतर प्राप्तिकर विभागाने कोडा,विनोद सिन्हा व त्यांच्याशी संबंधित देशभरातील १६७ ठिकाणी छापे घातले. व लोह आणि खाण तसेच ऊर्जा विभागातील भ्रष्ट्राचार उघडकीस आला. 

* २०१४ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय मधू कोडा आणि इतरांविरोधात खास न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केले. 

* न्यायालयाने कोडा यांच्यासह इतर आरोपीना समन्स जारी केले. न्यायालयातून जमीन मंजूर केले. कोडासह इतरांवर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश जारी केला. 

* १३ डिसेंबर २०१७ रोजी कोडा गुप्ता यांच्यासह इतर आरोपीना न्यायालयाने भ्रष्ट्राचार, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवले. व न्यायालयाकडून तीन वर्षे कैद आणि दंडाची शिक्षा केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.