शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महासचिव - १७ डिसेंबर २०१७

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महासचिव - १७ डिसेंबर २०१७

* लोकसभेच्या महासचिवपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

* नोव्हेंबर महिन्यात त्यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत असेल.

* लोकसभेचे विदयमान मुख्यसचिव अनुप मिश्रा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १ डिसेंबर रोजी श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारला.

* स्नेहलता श्रीवास्तव या १९८२ च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मध्यप्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे.

* त्यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे. श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच केंद्र साकरकरमध्ये अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे.

* लोकसभेच्या महासचिवसारख्या सर्वोच्च पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यसभेत रमा देवी या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.