मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

चीनच्या निर्णयामुळे पाकिस्तानला झटका - ६ डिसेंबर २०१७

चीनच्या निर्णयामुळे पाकिस्तानला झटका - ६ डिसेंबर २०१७

* चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर [सीपीईसी] अंतर्गत येणाऱ्या पाकिस्तानातील तीन महत्वाच्या रस्ते प्रकल्पाचा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.

* चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी प्रशासनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. रस्ते प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चीनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

* सुमारे ५० अब्ज डॉलर खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर [सीपीईसी] माध्यमातून पाकिस्तानात मोठे रस्ते प्रकल्प सुरु आहेत.

* मात्र सीपीईसी अंतर्गत सुरु असलेल्या तीन मोठ्या रस्ते प्रकल्पाला जाणारा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.

* या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निधी थांबविण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.